ICAR IARI Recruitment 2024 अंतर्गत भारतीय कृषी संशोधन संस्थे मार्फत सिनियर रिसर्च फेलो , यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असिस्टंट , प्रोजेक्ट असोसिएट यासारख्या विविध प्रकारच्या पदांसाठी थेट मुलाखती द्वारा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भारतीय कृषी संशोधन क्षेत्रात योगदान देण्याची मोठी संधी तरुणांना या भरती प्रक्रिया द्वारे मिळणार आहे. चला तर बघुया नेमक्या किती जागा या पदासाठी रिक्त आहेत , कोणते उमेदवार अर्ज करू शकतात आणि निवड प्रक्रिया कशी असेल ते आजच्या आपल्या ICAR IARI Recruitment 2024 या लेखात.
ICAR IARI Recruitment 2024 Overview
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अधीन असलेल्या ICAR म्हणजेच Central Institute for Cotton Research भारतीय कापूस संशोधन संस्थेने जाहिरात क्रमांक Admin/ Rectt/SRF/YP/2024 नुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये प्रोजेक्ट असिस्टंट , प्रोजेक्ट असोसिएट , सिनियर रिसर्च फेलो , यंग प्रोफेशनल, यासारख्या विविध पदासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
जे उमेदवार इच्छुक असतील अशा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीची अशी कोणतेही शेवटची तारीख आयोगाने दिली नसून पात्र उमेदवारांची मुलाखत ही दिलेल्या वेळी आणि तारखेला घेण्यात येणार आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | भारतीय कृषी संशोधन संस्था आणि भारतीय कापूस संशोधन संस्था ( Indian Agriculture Research Institute and Central Institute for Cotton Research ) |
पदाचे नाव : | १) सिनियर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) २) यंग प्रोफेशनल ( Young Professional ) ३) प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) ४) प्रोजेक्ट असोसिएट ( Project Associates ) |
पदाची संख्या : | २५ पदे |
अर्ज पद्धत : | ऑफलाईन पद्धतीने अर्ज |
अधिकृत संकेतस्थळ : | https://iari.res.in/ |
ICAR IARI Recruitment 2024 Important Dates
सिनियर रिसर्च फेलो , यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असिस्टंट , प्रोजेक्ट असोसिएट यासारख्या विविध पदे ही भारतीय कृषी संशोधन संस्थेत भरली जाणार असून आयोगाने यासाठी कोणत्याही प्रकारची अर्ज पद्धत ठेवली नाही आहे. जे उमेदवार इच्छूक असतील आणि जे पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करतील असे उमेदवाराची थेट मुलाखत घेतली जाईल. यासाठी आयोगाने ३ महत्वाच्या तारखा दिल्या आहेत ज्या वेळी मुलाखत प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
चला तर बघुया कोणते आहेत महत्वाचे तारखा.
दिनांक २७ मे , २८ मे , २९ मे २०२४ या दिवशी उमेदवारांना मुलाखती साठी बोलावले जाईल.
उमेदवारांसाठी आयोगाने रेपोर्टिंग वेळ देखील दिली आहे यानुसार सकाळी १०.०० ते १०.३० या कालावधी मध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
ICAR IARI Recruitment 2024 Vacancies
भारतीय कृषी संशोधन संस्थेत जी पदे भरली जाणार आहेत त्या प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहेत. हे आपण बघणार आहोत. ICAR IARI Recruitment 2024 द्वारे प्रसिद्ध जाहिराती मध्ये मुलाखतीच्या दिवसानुसार आणि प्रोजेक्ट आवश्यकतानुसार पदे आणि पदाची संख्या याची विभागणी केली आहे. आपण येथे संपूर्ण भरती प्रक्रियासाठी सिनियर रिसर्च फेलो , यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असिस्टंट , प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी किती जागा आहेत हे बघुया.
पदाचे नाव | पदाची संख्या |
१) सिनियर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) | ७ |
२) यंग प्रोफेशनल ( Young Professional ) | १५ |
३) प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) | २ |
४) प्रोजेक्ट असोसिएट ( Project Associates ) | १ |
ICAR IARI Recruitment 2024 Eligibility Criteria
ICAR IARI Recruitment मध्ये प्रोजेक्ट नुसार आवश्यक पात्रतेचे निकष दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक अर्हता आणि अनुभव हे पदानुसार दिल्या असून इतर आवश्यक त्या सर्व बाबी तपशील मध्ये जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहावी.
चला तर बघुया कोणते उमेदवार हे या पदासाठी अर्ज करू शकतात.
१) वयोमर्यादा ( Age Limit ) :
प्रोजेक्ट असिस्टंट , प्रोजेक्ट असोसिएटसिनियर रिसर्च फेलो , यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी आयोगाने किमान आणि कमाल वयाचे अट घातली आहे. यानुसार उमेदवाराचे मुलाखतीच्या वेळी असणारे वय हे आपण थोडक्यात बघुया.
१) सिनियर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) : | पुरुषसाठी ३५ वर्ष आणि महिलासाठी ४० वर्ष |
२) यंग प्रोफेशनल ( Young Professional ) : | वय वर्ष २१ ते ४५ वर्ष |
३) प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) : | ५० वर्ष |
४) प्रोजेक्ट असोसिएट ( Project Associate ) : | ३५ वर्ष |
सरकारी नियमानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि इतर सूट देण्यात आलेले घटक यांच्यासाठी वय शिथिलता Age Relaxation देण्यात आले आहे.
बघुया कोणत्या वर्गासाठी किती वय शिथिलता देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ( Scheduled Caste and Scheduled Tribes ) : | ५ वर्ष |
इतर मागासवर्गीय प्रवर्ग ( Other Backward Classes ) : | ३ वर्ष |
अपंग घटक ( Physically Handicapped) : | १० वर्ष |
२) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :
आयोगाने जाहीर केलेल्या पदासाठी भारतीय कापूस संशोधन संस्था मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रोजेक्ट साठी आवश्यकता नुसार सिनियर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) , यंग प्रोफेशनल ( Young Professional ) , प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) , प्रोजेक्ट असोसिएट ( Project Associates ) ही पदे भरली जाणार असल्याने याचा शैक्षणिक अर्हता बद्दलचे संपूर्ण तपशील आपल्याला जाहिरातीमध्ये वाचता येतील.
शैक्षणिक पात्रता आणि त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे याबाबत आयोगाने एक खास सूचना उमेदवारांना दिली आहे. या नुसार ज्या उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र नसल्यास अशा उमेदवारांना यंग प्रोफेशनल या पदासाठी पात्र धरले जाणार नाहीये.
ICAR IARI Recruitment 2024 Selection Procedure
भारतीय कापूस संशोधन संस्थाने राबवलेली भरती प्रक्रिया मध्ये रिक्त जागांसाठी सिनियर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ), यंग प्रोफेशनल ( Young Professional ) , प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) , प्रोजेक्ट असोसिएट ( Project Associates ) ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची आहे.
याबाबत कालावधी नमूद करताना आयोगाने जाहिराती मध्ये मार्च २०२५ ह्या कालावधी पर्यंतच ही पदे ग्राह्य असतील. सदर कालावधी संपल्यानंतर पुढील सेवेबद्दलची माहिती भारतीय कापूस संशोधन संस्था मार्फत आवश्यक असल्यास दिली जाईल.
उमेदवाराची निवड ही मुलाखत या एकाच टप्प्यात घेतली जाणार असेल तरी मुलाखत ज्या ठिकाणी आणि ज्या दिवशी आयोजित केली जाणार आहे त्या दिवशी एक लेखी परीक्षा सोबत मुलाखत होणार आहे.
मुलखात स्थळ : ICAR-Central Institute For Cotton Research Near Hotel Le -Meridan ,Panjari , Wardha Road Nagpur.
उमेदवाराची निवड यादी ही निवड कमिटी द्वारे मुलाखत मध्ये होणाऱ्या कामगिरी वर आधारित बनवली जाईल. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांची अंतिम निवड यादी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल.
भारतीय कापूस संशोधन संस्थाने सदर भरती प्रक्रिया साठीची सर्व हक्क जसे की जागा वाढवणे कमी करणे किंवा सदर जागाच न भरणे स्वतःकडे ठेवले आहेत. यात केले जाणारे बदल हे आयोगाच्या नोटीस बोर्डावर लावले जातील
ICAR IARI Recruitment 2024 How to Apply
ICAR IARI Recruitment अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रिये साठी इच्छूक उमेदवारांना कोणत्याही प्रकारचां अर्ज भरायचा नाही आहे.
आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रे घेऊन उमेदवारांना निवड प्रक्रिये साठी मुलाखत स्थळी उपस्थित राहायचे आहे.उमेदवाराने यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेने आपल्या जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व नियम आणि अटी वाचणे आवश्यक आहे.
आयोगाने जाहीर केलेली भरती प्रक्रिया ही तात्पुरत्या स्वरूपाची / करार पद्धतीची असून विहित केलेला कालावधी पूर्ण केल्यास पुढील कामाची अथवा कायमस्वरूपी निवडीची कोणतही रूपरेषा आयोगाने दिलेली नाहीये.
उमेदवाराने आपल्या सोबत आवश्यक असलेले कागदपत्रे हे मूळ कागदपत्रा सहित तपासणी पडताळणी करिता सादर करायचे आहे.
चला तर बघुया कोणते महत्वाचे कागदपत्रे उमेदवारांना अर्ज सोबत आणायचे आहे. यामध्ये प्रामुख्याने वय , शिक्षण , जात , अनुभव यासारखे दस्तावेज असतील.
१) जन्म तारीख पुरवासाठी जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला.
२) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
३) आयोगाने नमूद केलेल्या क्षेत्रातील अनुभव असल्याचे प्रमाणपत्र.
४) उमेदवार अनुसूचित जाती ( Schedule Caste and Scheduled Tribes ) अनुसूचित जमाती , इतर मागासवर्गीय ( Other Backward Classes ) आणि अपंग घटक ( Person With Physical Disability ) यामधून असल्यास जात प्रमाणपत्र.
५) एक पासपोर्ट साईझ फोटो.
वर नुमद केलेले सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असणार आहे.
ICAR IARI Recruitment 2024 Application Fee
सिनियर रिसर्च फेलो , यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असिस्टंट , प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क अथवा परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
ICAR IARI Recruitment 2024 Salary
भारतीय कापूस संशोधन संस्थामध्ये सिनियर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) यंग प्रोफेशनल ( Young Professional )प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant )प्रोजेक्ट असोसिएट ( Project Associates ) पदासाठी आयोगाकडून प्रती महिना काही रक्कम ही मानधन म्हणून दिली जाणार आहे.
चला तर बघुया वर नमूद केलेल्या पदासाठी किती वेतन मिळनार आहे.
पदे | प्रती महिना वेतन |
१) सिनियर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) : | रुपये ३१,००० प्रती महिना. |
२) यंग प्रोफेशनल ( Young Professional ) : | रुपये ३०,००० ते ४२,००० प्रती महिना. |
३) प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) : | रुपये २५,००० प्रती महिना. |
४) प्रोजेक्ट असोसिएट ( Project Associates ) : | रुपये २०,००० ते २५,००० प्रति महिना. |
Conclusion
Frequently Asked Questions
१) ICAR IARI Recruitment 2024 साठी कोण अर्ज करू शकते ?
उत्तर : भारतीय कापूस संशोधन संस्था मार्फत भरतीसाठी आयोगाने दिलेल्या शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अंनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
२) ICAR IARI Recruitment 2024 मध्ये भरली जाणारी पदे कायमस्वरूपी निवड असणार आहे का ?
उत्तर : भारतीय कापूस संशोधन संस्था मार्फत भरतीसाठी भरली जाणारी पदे ही करार पद्धती वर असून मार्च २०२५ पर्यंतचा कालावधी पूर्ण झाल्यास उमेदवार कायमस्वरूपी निवड केली जाणार नाही.
३) ICAR IARI Recruitment 2024 साठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे ?
उत्तर : भारतीय कापूस संशोधन संस्था मार्फत भरतीसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांची निवड ही मुलाखत या एकाच टप्प्यात होणार आहे.
४) ICAR IARI Recruitment 2024 मध्ये कोणते पदे भरली जाणार आहेत ?
उत्तर : भारतीय कापूस संशोधन संस्था मार्फत भरतीमध्ये पुढील पदे भरली जाणार आहेत यामध्ये प्रामुख्याने सिनियर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) , यंग प्रोफेशनल ( Young Professional ) , प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ), प्रोजेक्ट असोसिएट ( Project Associates ) ही पदे असतील.
५ ) ICAR IARI Recruitment 2024 साठी मुलाखत हा टप्पा केव्हा पार पाडला जाणार आहे ?
उत्तर : भारतीय कापूस संशोधन संस्था मार्फत भरतीसाठी मुलाखत हा टप्पा दिनांक २७ मे , २८ मे , २९ मे २०२४ या दिवशी पार पडला जाईल.