MRVC Recruitment द्वारा नुकतीच मॅनेजर या पदांसाठी भरती प्रक्रियासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधीन असणाऱ्या आणि भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असणारी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन ( MRVC : Mumbai Railway Vikas Corporation) मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही एक मोठी संधी असणार आहे.
सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२४ असणार आहे.
MRVC Recruitment 2024 Overview
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये असणाऱ्या मॅनेजर पदाच्या भरती साठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. MRVC ने आपल्या सूचना क्रमांक एम आर वी सी / ई / ए जी एम / जे जी एम ( सिव्हिल ) / ६ / २०२४ नुसार सदर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक या निर्णायक पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
चला तर बघुया नेमक्या किती जागा या भरती द्वारे भरली जाणार आहेत , निवडीचे निकष कोणते आहेत , कोणते उमेदवार या भरती प्रक्रिया साठी अर्ज करू शकतात या सर्व बाबी थोडक्यात.
जाहिरात प्रसिद्ध : | रेल्वे भरती बोर्ड ( Railway Recruitment Board ) |
पदाचे नाव : | अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) / संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) |
पदांची संख्या : | एकूण २ जागा |
अर्जाची पद्धत : | ऑनलाईन पद्धतीने ( Online Mode ) |
अधिकृत संकेतस्थळ : | https://mrvc.indianrailways.gov.in/ |
MRVC Recruitment 2024 Important Dates
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारा जाहीर केलेल्या भरतीसाठी आयोगाने काही महत्वाच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी या लक्षात घेऊन अर्ज दाखल करणे आवश्यक असणार आहे. आयोगाने प्रस्तुत केलेल्या तारखे नंतर आलेले कोणतेही अर्ज हे निवडीच्या पुढील टप्प्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
चला तर बघुया , अर्ज भरण्याची सुरवात केव्हा होणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय असणारे , अर्ज शुल्क कोणत्या तारखे पर्यंत भरायचे आहे या सर्व बाबी थोडक्यात.
अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : | ९ मे २०२४ |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | ७ जून २०२४ |
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : | ७ जून २०२४ |
MRVC Recruitment 2024 Vacancies
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन द्वारा भरल्या जाणाऱ्या पदांचा विचार करता यात प्रामुख्याने मॅनेजर लेवलची पदे भरली जाणार आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन सारख्या महत्वाच्या सरकारी उपक्रमात निर्णायक पदावर काम करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.
चला तर बघुया नेमकी कोणती आणि किती पदे ही या भरती प्रक्रिया दरम्यान भरली जाणार आहेत.
पदाचे नाव | पदाची संख्या |
अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) : | १ |
संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) : | १ |
MRVC Recruitment 2024 Eligibility Criteria
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) / संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) पदावर काम करण्यासाठी काही पात्रतेचे निकष आखून दिले आहेत.
बघुया कोणते उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
१) वयोमर्यादा ( Age Limit ) :
आयोगाने वयाबाबत कोणतेही किमान वयाचे बंधन ठेवले नाही आहे. मात्र अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय हे ५० वर्ष असणे आवश्यक आहे.
२) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) :
शैक्षणिक अर्हताचा विचार केल्यास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण झालेला असावा. तसेच इंजिनीअरिंग/ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट यामध्ये पदवीत्तर शिक्षण असल्यास उमेदवाराला प्राधान्य मिळेल.
Read More : NHPC Recruitment 2024 एन.एच.पी.सी लिमिटेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरती
३) अनुभव ( Experience ) :
आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये दोन्ही पदासाठी काही अनुभव असल्याचे नमुद केले आहे. विविध वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात सविस्तरपणे वाचणे आवश्यक आहे.
चला तर बघुया मॅनेजर पदासाठी किती वर्ष आणि कोणता अनुभव लागणार आहे.
अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) :
या पदासाठी कमीत कमी १२ वर्षाचा अनुभव असावा तसेच पदवीत्तर कामाचा अनुभव हा कमीत कमी ८ वर्ष असावा. उमेदवाराचा अनुभव हा वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्प या सारख्या रेल्वे सुविधामध्ये असावा.
सरकारी निमसरकारी संस्था तसेच भारत सरकारच्या अधीन असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ( PSU ) यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सुरवातीची २ वर्ष करार पद्धतीवर काम करायचे असून हे करार २ वर्ष संपल्यावर ३ वर्षासाठी वाढवले जाईल.
संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) :
या पदासाठी वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्प या सारख्या रेल्वे सुविधामध्ये कमीत कमी ८ वर्ष आणि पदवीत्तर ६ वर्ष कामाचा अनुभव असावा. या दोन्ही पदासाठी खाजगी क्षेत्रातील असणारा अनुभव हा ज्या कंपनीचा वर्षाची उलाढाल ही ५०० कोटी पेक्षा जास्त असावी.
कार्य आणि जबाबदारी ( Duties and Responsibilities ) :
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) / संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) या पदावर कार्यभाग सांभाळताना उमेदवाराला विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे नियोजन आणि विस्तार करायचा आहे. तसेच मॅनेजमेंट द्वारा सूचित केलेले काम पार पाडायचे आहे.
MRVC Recruitment 2024 Selection Procedure
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये अंतिम निवड प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले निकष आपल्या जाहिराती दिले आहे. यानुसार उमेदवाराची निवड ही त्याने मागील कोणत्याही संस्था / इन्स्टिट्यूट आणि सद्या काम करत असलेल्या संस्था / इन्स्टिट्यूट मध्ये कोणत्या प्रकारचे काम करत आहे यावर एक जॉब प्रेझेंटेशन हे मुलाखती दरम्यान द्यायचे आहे. सोबतच ज्या पदासाठी उमेदवाराने अर्ज केला आहे त्या पदासंबंधी असलेला अनुभव देखील मांडणे आवश्यक आहे.
उमेदवाराची निवड ही मुलाखत आणि अनुभव ह्या दोन गोष्टी मधील कामगिरीवर होणार आहे.
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या https://mrvc.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.कागदपत्रे तपासणी वेळीस उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि अर्जाची प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
अर्जात नमुद केलेल्या माहितीचा कोणताही पुरावा कमी असल्यास अथवा नसल्यास उमेदवाराची मुलाखत ह्या टप्प्यासाठी बोलावले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
सेवा करार ( Service Agreement ) :
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये कमीत कमी २ वर्ष सेवा देणे आवश्यक असणार आहे. यासाठी उमेदवाराने सेवा निश्चिती साठी रुपये १ लाख जमा तसेच रुपये १०० च्या बाँड पेपर वर सेवा देण्याचा करार करायचा आहे.
MRVC Recruitment 2024 How to Apply
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक या पदावर निवडीसाठी आवश्यक सर्व नियम आणि अटी जाहिराती मध्ये नमूद केल्या असून अर्ज पाठविण्या पूर्वी वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असली तरी अर्ज करण्यासाठी कोणतीही लिंक आयोगाकडून देण्यात आली नाही आहे.
जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांना आपल्या ईमेल आयडी वरून अर्ज आणि आवश्यक कागदपत्र सोबत जोडून मेल करायचा आहे.
उमेदवाराला हा अर्ज Manager ( HR ), Mumbai Railway Vikas Corporation ला पाठवायचा आहे.
यासाठी career@mrvc.gov.in या ईमेल आयडी वर अर्ज पाठवायचा आहे.
अशा मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ७ जुन २०२४ असणार आहे.
अर्ज आणि अर्जासोबत असलेले सर्व कागदपत्रे ही स्व: साक्षांकित केलेली असावी. उमेदवाराने अर्ज भरताना आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रे ही बनावट अथवा कोणतेही गैर मार्ग वापरून काढलेली नसावे.
अपूर्ण अर्ज आणि अपूर्ण कागदपत्रे असलेले कोणतेही अर्ज हे निवडी साठी ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी अशी स्पष्टता मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन ने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केले आहे.
MRVC Recruitment 2024 Application Fee
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन द्वारा होणाऱ्या मॅनेजर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क हे आकारले जाणार नाही. तसेच आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही आहे.
MRVC Recruitment 2024 Documents
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन द्वारा सूचित जाहिराती मध्ये आवश्यक कागदपत्राची यादी दिलेली असून उमेदवाराने अर्ज भरताना आवश्यक ती सर्व माहिती भरणे गरजेचे आहे आणि त्या माहिती पडताळणी करिता आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे तपासणी पडताळणी वेळेस सादर करणे बंधनकारक राहील.
चला तर बघुया नेमकी कोणते कागदपत्र उमेदवाराने सोबत बाळगणे आणि सादर करायची आहेत.
१) अर्जाची प्रत
२) शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणारे कागदपत्र जसे की पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रक
३) जन्म तारीख पडताळणी करिता जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला
४) आधार कार्ड किंवा पॅनकार्ड
५) आवश्यक असल्यास अनुभव प्रमाणपत्र
६) राजपात्रित अधिकारी किंवा कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्राप्त असलेले चारित्र्य प्रमाणपत्र.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ही सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असणार आहे.
याशिवाय इतर काही कागदपत्र देखील सोबत जोडणे आवश्यक आहे यात प्रामुख्याने पुढील बाबी आहेत.
१) सद्या कार्य करत असलेल्या किंवा मागील कोणत्या पदावर कार्य करत असल्याचा दाखला.
२) उत्पन्नाचा दाखला म्हणून अर्ज क्रमांक १६
३) तसेच कामगार भविष्य निर्वाह निधी अर्थात EPF क्रमांक कागदपत्रे.
MRVC Recruitment 2024 Salary :
अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) / संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) सारख्या महत्वाच्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना काही ठराविक रक्कम ही मासिक वेतन म्हणून दिली जाणार आहे. बघूया कोणत्या पदासाठी किती मानधन दिले जाणार आहे.
अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) : | रुपये २,०३,७४४ प्रति महिना. |
संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) : | रुपये १,८३,४५० प्रती महिना. |
Conclusion
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन सारख्या भारत सरकारच्या अधीन असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) / संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून अर्ज दाखल करणारा उमेदवाराचे कमाल वय ५० वर्ष आणि सोबतच सिव्हिल इंजनिअरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले असावे. अर्ज हा ईमेल द्वारा करायचा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे देखील पाठवायची आहे. अपर महाप्रबंधक ( AGM ) / संयुक्त महाप्रबंधक ( JGM ) या पदासाठी किमान १२ वर्ष आणि किमान ८ वर्ष अनुक्रमे पदानुसार अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराची निवड ही जॉब प्रेझेंटेशन देऊन केली जाईल.
Frequently Asked Questions
१) MRVC Recruitment 2024 यासाठी कोणती पदे भरली जाणार आहेत ?
उत्तर : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) / संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) ही पदे भरली जाणार आहेत.
२) MRVC Recruitment 2024 साठी कोण अर्ज करू शकतो ?
उत्तर : अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आपले वर दिलेले आर्टिकल पुन्हा एकदा बघुन घ्या.
३) MRVC Recruitment 2024 साठी उमेदवाराची निवड कशी होणार आहे ?
उत्तर : MRVC Recruitment 2024 साठी असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये अपर महाप्रबंधक ( Additional General Manager ) / संयुक्त महाप्रबंधक ( Joint General Manager ) या पदावर उमेदवाराची निवड ही मुलाखत आणि अनुभव ह्या दोन गोष्टी मधील कामगिरीवर होणार आहे.
४) MRVC Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ?
उत्तर : सदर भरती करिता उमेदवाराला अर्ज आणि सोबत आवश्यकच असलेले कागदपत्रे आयोगाने दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवायचे आहे.
५) MRVC Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर : MRVC Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२४ असणार आहे.