NHPC Recruitment 2024 एन.एच.पी.सी लिमिटेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरती.

NHPC Recruitment 2024 एन.एच.पी.सी लिमिटेड द्वारे नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एन.एच.पी.सी लिमिटेड ही भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून हा प्रामुख्याने ऊर्जा मंत्रालय , भारत सरकारच्या महत्वाच्या उपक्रम पैकी एक असून एन.एच.पी.सी लिमिटेड मध्ये काम करण्याची संधी पात्र उमेदवारांना असणार आहे.

चला तर बघुया नेमकी जाहिरात किती जागांसाठी आहे , निवड प्रक्रिया कशी असणार आहे , पात्रतेचे निकष काय आहेत , यासारख्या आवश्यक बाबींचा आढावा आपण आज यातून घेणार आहोत.

NHPC Recruitment 2024 Overview

एन.एच.पी.सी लिमिटेड अंतर्गत सूचना क्रमांक TPS/HR/Apprentice/01/2024/730 नुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. एन.एच.पी.सी लिमिटेड ने ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी घेण्यात येणार आहे.

पदाचा विचार केला तर सदर आयटीआय उमेदवारांची भरती ही प्रशिक्षणार्थी म्हणजेच Apprenticeship Trainee म्हणून केली जाईल. एन.एच.पी.सी लिमिटेडच्या तनकापूर पॉवर स्टेशन येथील युनिट मध्ये रिक्त असणाऱ्या रिक्त पदांचा समावेश यात करण्यात आला आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना तनकापूर पॉवर स्टेशन ( Tankapur Power Station ) या युनिट मध्ये काम करावे लागणार आहे.

NHPC Recruitment 2024 Important Dates

कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या संस्था अथवा आयोगा कडून महत्वाच्या तारखा या जाहीर केल्या जातात अन् केवळ याच कालावधी मध्येच उमेदवारांना अर्ज भरणे , अर्ज शुल्क भरणे यासारख्या आवश्यक गोष्टी पूर्ण करणे आवश्यक असते.

एन.एच.पी.सी लिमिटेडने आपल्या जाहिराती मध्ये दिल्या प्रमाणे पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन- ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया १० मे २०२४ पासून सुरू होईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की एन.एच.पी.सी ने अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अन् ऑफलाईन पद्धत वापरत असल्याने आयोगाने जाहीर केलेल्या कालावधी मध्येच ही ऑनलाईन लिंक ओपन असेल व दिलेल्या तारखेच्या आत अर्ज आयोगाकडे पोहचणे आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या तारखा आपण एका टेबल च्या माध्यमातून बघणार आहोत.

चला तर नाजर टाकुया अर्ज भरण्याच्या तारीखेवर.

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख : १० मे २०२४
ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करण्याची शेवटची तारीख :३० मे २०२४
आवश्यक कागदपत्रासहीत अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :१० जून २०२४
NHPC-Recruitment-2024

NHPC Recruitment 2024 Vacancies

एन.एच.पी.सी लिमिटेड द्वारे राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया मधील पदांचा विचार केलास सर्व रिक्त जागा या Apprenticeship Trainee अर्थात प्रशिक्षणार्थी म्हणून केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भाग घेता येणार आहे. आयटीआय मध्ये असणाऱ्या विविध ट्रेड लक्षात घेता यातील काही निवडक ट्रेड चा समावेश यात करण्यात आला आहे.

चला तर बघुया नेमके कोणते ट्रेड मधील उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत.

एकूण ११ ट्रेड साठी ६४ जागा या भरल्या जाणार आहेत.

कोपा ( COPA )इलेक्ट्रोनिक मेकॅनिक
( Electronic Mechanic )
स्टेनोग्राफर ( Stenographer ) आणि
सचिवीय सहाय्यक ( Secretarial Assistant )
वायरमन ( Wireman )
इलेक्ट्रिशियन ( Electrician )प्लंबर ( Plumber )
फिटर ( Fitter )वेल्डर ( Welder )
मेकॅनिक ( Mechanic )मशिनिस्ट ( Machinist )
टर्नर ( Turner )

Central Railway Recruitment,मध्य रेल्वे मध्ये शिक्षक पदाची भरती,परीक्षा न होता होणार निवड

वरील ट्रेड मधील उमेदवारांची निवड ही प्रशिक्षणार्थी म्हणून केली जाणार आहेत.

बघुया कोणत्या ट्रेड साठी नेमक्या किती जागा या एन.एच.पी.सी लिमिटेड द्वारे भरली जाणार आहेत.

ट्रेडचे नावपदांची संख्या
कोपा ( COPA )१२
स्टेनोग्राफर ( Stenographer ) आणि
सचिवीय सहाय्यक ( Secretarial Assistant )
१०
इलेक्ट्रिशियन ( Electrician )१५
फिटर ( Fitter )
मेकॅनिक ( Mechanic )
टर्नर ( Turner )
मशिनिस्ट ( Machinist )
इलेक्ट्रोनिक मेकॅनिक ( Electronic Mechanic )
वेल्डर ( Welder )
प्लंबर ( Plumber )
वायरमन ( Wireman )

NHPC Recruitment 2024 Eligibility Criteria

एन.एच.पी.सी लिमिटेडने आपल्या जाहिराती मध्ये काही पात्रतेचे निकष घालून दिलेले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.

चला तर बघुया नेमके कोणते पात्रतेचे निकष आहेत.आयोगाने प्रामुख्याने वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता आणि आरक्षण या बाबी दिलेल्या आहेत.

१) वयोमर्यादा ( Age Limit ) :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांबाबत आयोगाने किमान वय हे १८ वर्ष आणि कमाल वय हे २५ वर्ष असणे आवश्यक आहे. सोबतच आयोगाने सरकार नियमानुसार अनुसूचित जाती ( Scheduled Caste ), अनुसूचित जमाती ( Scheduled Tribes ) , इतर मागासवर्गीय ( Other Backward Classes ) आणि अपंग घटक ( Physically Handicapped) यांच्या साठी वय शिथिलता Age Relaxation देण्यात आली आहे.

बघुया कोणत्या प्रवर्गासाठी किती वय शिथिलता ( Age Relaxation ) आहे.

अनुसुचित जाती अनुसूचित जमाती
( Scheduled Caste and Scheduled Tribe ) :
५ वर्ष
इतर मागासवर्गीय
( Other Backward Classes ) :
३ वर्ष
अपंग घटक
( Physically Handicapped ) :
१० वर्ष

२) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

शैक्षणिक पात्रता लक्षात घेता आयोगाने रिक्त जागांसाठी आवश्यक असलेल्या विविध आयटीआय ट्रेड चा सामावेश केला आहे. एकुण ११ ट्रेड यामध्ये असतील.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

NHPC-Recruitment-2024

३) आरक्षण ( Reservations ) :

एन.एच.पी.सी लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार आणि सरकारच्या प्रशिक्षणार्थी आरक्षण तरतुदी नुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय तसेच अपंग घटक यांच्या साठी आरक्षण देण्यात आले आहेत.

ज्या उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज भरताना आणि तपासणी वेळेस जात प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असणार आहे.

NHPC Recruitment 2024 Selection Procedure

एन एच पी सी लिमिटेडद्वारा प्रशिक्षणार्थी म्हणून निवड होण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार हा चांगल्या गुणा सहित आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असावा कारण याच आधारावर उमेदवाराची निवड होणार आहे. म्हणजेच उमेदवाराची अंतिम निवड ही आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणावर होणार आहे.

निवड यादी जाहीर करताना जर दोन उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल तो उमेदवार ग्राह्य धरला जाईल.जे उमेदवार अंतिम यादीत निवडले जातीला त्याची निवड यादी www.nhpcindia.com या संकेतस्थळावरील करियर या सेक्शन मध्ये जाहीर केली जाईल.

करार करण्या संबधित सर्व माहिती उमेदवाराच्या नोंद केलेल्या ईमेल आयडी वर पाठवले जाईल. या संबधित सर्व प्रकारची माहिती www.Apprenticeshipindia.org यावर मिळेल.

जे उमेदवार या अगोदर कुठल्याही उपक्रमात प्रशिक्षणार्थी म्हणून असल्यास किंवा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार नाही आहे.

प्रशिक्षण कालावधी ( Training Period ) :

अंतिम यादीत निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी प्रशिक्षण कालावधी देण्यात आला आहे.

NHPC Limited Recruitment How to Apply

एन.एच.पी.सी लिमिटेड भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी www.nhpcindia.com या आधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली जाहिराती सविस्तरपणे तसेच सोबत नियम व अटी वाचून घ्याव्यात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.Apprenticeshipindia.org या Apprenticeship साठी असलेल्या पोर्टलवर नोंदणी करायची आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी असणे आवश्यक असून निवड प्रक्रियेच्या पुढील कोणत्याही सूचना साठी दोन्ही गोष्टी असणे गरजेचे आहे.नाव नोंदणी झाल्यावर उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने आवश्यक ती सर्व माहिती भरून अर्ज भरायचा आहे.

उमेदवाराने सोबत आवश्यक असलेले कागदपत्रे स्व साक्षांकित प्रत जोडावी.

अर्ज आणि सोबत जोडलेल्या आवश्यक कागदपत्र सह ते पुढे दिलेल्या पत्त्यावर १० जून २०२४ आत पोहचणे बंधनकारक आहे.

प्रत पाठविण्याचे स्थळ : Dy. Manager (HR), Tanakpur Power Station, NHPC Limited, Banbasa, District Champawat, Pin-262310

NHPC Recruitment 2024 Application Fee

एन.एच.पी.सी लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क अथवा परीक्षा शुल्क नमूद केले नाही आहे.

NHPC Recruitment 2024 Documents

ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी एन.एच.पी.सी लिमिटेडने अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले आहेत. बघूया कोणते कागदपत्र तपासणी पडताळणी साठी आवश्यक आहेत.

१) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र

२) दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका

३) आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका

४) आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र

५) आधार कार्ड

६) पॅनकार्ड

७) जातीचे प्रमाणपत्र

८) अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र

अर्जासोबत जोडलेली वरील सर्व कागदपत्रे ही स्व:साक्षांकित केलेली असावी.

Conclusion

NHPC Recruitment 2024अंतर्गत एन.एच.पी.सी लिमिटेडने आपल्या जाहिराती मध्ये प्रसिद्ध केल्या प्रमाणे एकूण ६४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या साठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करून ऑफलाईन पद्धतीने भरलेला अर्ज दिनांक १० जून पर्यंत आवश्यक कागदपत्र सोबत अर्ज आयोगाने दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. उमेदवाराची निवड ही आयटीआय उत्तीर्ण झालेल्या गुणा द्वारे केली जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून तानकापुर पॉवर स्टेशन येथे काम करायचे आहे.

Frequently Asked Questions

१) NHPC Recruitment 2024 साठी कोण अर्ज करू शकते ?

उत्तर : एन.एच.पी.सी लिमिटेड भरती साठी दहावी उत्तीर्ण आणि सोबत आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किमान १८ आणि कमाल २५ वय वर्ष असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

२) NHPC Recruitment 2024 अर्ज कोणत्या पद्धतीने सादर करायचा आहे ?

उत्तर : एन.एच.पी.सी लिमिटेड भरती साठी ऑनलाईन नोंदणी झाल्यावर उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज सहित आवश्यक कागदपत्रे जोडणे व आयोगाने दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

३) NHPC Recruitment 2024 ची निवड प्रक्रिया कशी असेल ?

उत्तर : एन.एच.पी.सी लिमिटेड भरती जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे उमेदवाराची अंतिम निवड ही आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणावर होणार आहे.

४) NHPC Recruitment 2024 कोणत्या ट्रेड चा समावेश असेल ?

उत्तर: एन.एच.पी.सी लिमिटेड भरती अंतर्गत पुढील आयटीआय ट्रेड चा समावेश असेल ; कोपा ( COPA ) , स्टेनोग्राफर ( Stenographer ) आणि सचिवीय सहाय्यक ( Secretarial Assistant ) , इलेक्ट्रिशियन ( Electrician ) , फिटर ( Fitter ) , मेकॅनिक ( Mechanic ) , टर्नर ( Turner ) , मशिनिस्ट ( Machinist ) , इलेक्ट्रोनिक मेकॅनिक ( Electronic Mechanic ) , वेल्डर ( Welder ) , प्लंबर ( Plumber ) , वायरमन ( Wireman ) .

५) NHPC Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : एन.एच.पी.सी लिमिटेड भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२४ आहे.