Central Railway Recruitment 2024 द्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मध्य रेल्वेमध्ये शिक्षक या पदांची भरती होणार आहे. इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १७ मे २०२४ असणार आहे. रेल्वे मध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांना ही एक सुवर्ण संधी असणार आहे. चला तर बघुया नेमकी जाहिरात काय आहे ती थोडक्यात.
Central Railway Recruitment 2024 Overview
मंडळी , रेल्वे मध्ये काम करण्याचे स्वप्न घेऊन कित्येक उमेदवार रेल्वे बोर्डाकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या परीक्षा देत असतात. नुकतेच Central Railway Recruitment 2024 अंतर्गत रेल्वे बोर्डाने नोटफिकेशन क्रमांक : P/NGP/RCT/2020/3 नुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी विविध शिक्षक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे Higher Secondary School Nainpur मध्यप्रदेश या ठिकाणी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यासाठी करार पद्धती वर पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे बोर्डाकडून प्रसिद्ध जाहिराती मध्ये दिल्या प्रमाणे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा , अनुभव व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ( South East Central Railway ) |
पदांचे नाव : | पदव्युत्तर शिक्षक ( Post Graduate Teacher ) , प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( Trained Graduate Teacher ), प्राथमिक शाळा शिक्षक ( Primary School Teacher ), हस्तकला , चित्रकला आणि अतिरिक्त अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक : (Craft Drawing And Extra Curricular Activity Teacher ) |
पदांची संख्या : | २१ पदे |
अर्ज पद्धत : | ऑफलाईन पद्धत ( Offline Mode ) |
अधिकृत संकेतस्थळ : | https://secr.indianrailways.gov.in/ |
Central Railway Recruitment 2024 Important Dates
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बोर्डाकडून प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही तारखा जाहीर केलेल्या आहेत. जे उमेदवार पात्र असतील त्यांना विहित केलेल्या कालावधी मध्येच अर्ज सादर करायचा आहे. तर आयोगाने या साठी आपल्या जाहिराती मध्ये १७ मे २०२४ ही तारीख दिली आहे.
उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की रेल्वे बोर्डाने जाहीर केलेली तारीख हि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख नसून याच तारखेला म्हणजेच १७ मे २०२४ या दिवशीच सकाळी ८.३० वाजल्यापासून उमेदवाराची निवड प्रक्रिया सुरू आणि संपणार होणार आहे. म्हणजेच एका दिवसात होणारी निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे हे आपण याच भागात जाणून घेणार आहोत.
मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग भरती , एकूण ८६१ पदे आणि २४ ट्रेड.
Central Railway Recruitment 2024 Vacancies
मध्य रेल्वेमध्ये शिक्षक पदाची जी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यात नेमक्या किती जागा असणार आहेत , कोणती पदे असणार आहेत अन् कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत हे आपण थोडक्यात बघणार आहोत.
तर मित्रांनो शिक्षक पदासाठी होणारी निवड प्रक्रिया ही प्रामुख्याने पुढील पदांसाठी होणार आहे. यात Post Graduate Teacher , Trained Graduate Teacher, Primary School Teacher , Craft Drawing And Extra Curricular Activity Teacher यासारख्या विविध पदे यात असतील.
ही सर्व पदे काही महत्वाच्या विषयासाठी असणार आहेत. यात English , Chemistry, Hindi , Sanskrit , Economics/ Commerce, Math’s , Social Science with Geography, Science with Biology, Science With Political Science, Physical Education Teacher या सारखे विषयांचा शिक्षकांचा समावेश असेल तसचे इयत्ता पाचवी पर्यंत सर्व विषय शिकणारे शिक्षक देखील निवडले जाणार आहे.
चला तर बघुया की कोणत्या पदानुसार किती जागा रिक्त आहेत.
पदांचे नाव | पदांची संख्या |
पदव्युत्तर शिक्षक : Post Graduate Teacher | ३ |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : Trained Graduate Teacher | १३ |
प्राथमिक शाळा शिक्षक : Primary School Teacher | ४ |
हस्तकला , चित्रकला आणि अतिरिक्त अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक : Craft Drawing And Extra Curricular Activity Teacher | १ |
Central Railway Recruitment 2024 Eligibility Criteria
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रिक्त जागांसाठी सदर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून रेल्वे बोर्डाकडून प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये आवश्यक ते पात्रतेचे निकष हे पदानुसार दिलेले आहेत. यात प्रामुख्याने शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा इत्यादी निकष असणार आहे.
१) वयोमर्यादा Age Limit
आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये किमान वय आणि कमाल वय वर्ष हे स्पष्टपणे नमूद केले आहे, त्यानुसार शिक्षक पदांसाठी मुलाखत देणारा उमेदवाराचे किमान वय हे १८ वर्ष ते कमाल वय हे ६५ वर्ष या दरम्यान असावे. रेल्वे बोर्डाने वय शिथिलता बाबत कोणतीही गोष्ट नमुद केली नाही आहे.
२) शैक्षणिक पात्रता Educational Qualification
रेल्वे बोर्डाने पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक , प्राथमिक शाळा शिक्षक , हस्तकला , चित्रकला आणि अतिरिक्त अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक यासारख्या विविध प्रकारच्या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता नमूद केली आहे. यात प्रामुख्याने बी एड किंवा डी एड उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी थेट मुलाखती देत येतील.
चला तर बघुया काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे एका तक्त्याच्या माध्यमातून..
१) पदव्युत्तर शिक्षक : | ए) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट अथवा बोर्ड कडून मास्टर पदवी कमीत कमी ५० टक्के सहित उत्तीर्ण असावे. ब) बी एड किंवा समकक्ष पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. क) हिंदी किंवा इंग्लिश माध्यम भाषा अवगत असावे सोबत कॉम्प्युटर ज्ञान असावे. |
२) प्राथमिक शाळा शिक्षक : | ए) नमूद केलेल्या विषयात पदवी अथवा दोन वर्षांचा एलिमेंटरी एज्युकेशन मध्ये पदवी प्राप्त. ब) कमीत कमी ५० टक्के सहित पदवी अथवा बि एड उत्तीर्ण. क) कमीत कमी ५० टक्के सहित चार वर्ष अभ्यासक्रम बी ए बी एड / बी एस सी एड. ड) आणि TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
३) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : | ए) नमूद केलेल्या विषयात पदवी अथवा दोन वर्षांचा एलिमेंटरी एज्युकेशन मध्ये पदवी प्राप्त. ब) कमीत कमी ५० टक्के सहित पदवी अथवा बि एड उत्तीर्ण. |
४) हस्तकला , चित्रकला आणि अतिरिक्त अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक : | बारावी उत्तीर्ण आवश्यक सोबतच संबंधित विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. |
मुंबईमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्ण संधी,Tata Memorial Hospital Recruitment
Central Railway Recruitment Selection Process
मध्य रेल्वे बोर्डाकडून आयोजित भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे होणार आहे. शिक्षक पदासाठी होणारी भरती ही करार पद्धती नुसार म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट आधारित असणार आहे. सदर भरती प्रक्रिया ही शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी होणार आहे. यामध्ये उमेदवाराची निवडी साठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नसून उमेदवाराची निवड ही मुलाखत या एकाच टप्प्यात होणार आहे.
ज्या उमेदवारांना आयोगाने जाहीर केलेल्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज आणि सोबत जोडलेल्या आवश्यक कागदपत्र सह पुढील मुलाखत ठिकाणी उपस्थित रहावे लागणार आहे. उमेदवारांच्या संख्येनुसार ही मुलाखत १७ मे किंवा त्या पुढील दिवशी पार पाडली जाईल.
मुलाखतीचे स्थळ : | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे उच्च माध्यमिक शाळा नैनपुर मध्य प्रदेश. |
मुलाखतीची तारीख : | १७ मे २०२४ , सकाळी ८.३० पासून. |
Central Railway Recruitment 2024 How to Apply
Central Railway Recruitment द्वारा होणाऱ्या भरती प्रक्रिया साठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सोपी अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून अर्ज डाऊनलोड करायचा आहे. यासाठी उमेदवाराने www.secr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जावून होम पेज वर दिसणाऱ्या Recruitment भरती सेक्शन मध्ये News अन् पुढे Press Release>> Nagpur Division मध्ये Notification of Contract Teacher 2024-25 यावर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करायचा आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या अर्जात सर्व आवश्यक माहिती उमेदवाराने अचूक भरायची आहे. सोबतच उमेदवाराने भरलेल्या माहितीच्या फेर तपासणी साठी आवश्यक असलेले आणि आयोगाने आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहे.
अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन उमेदवारांना रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या स्थळावर जाहीर केलेल्या तारीख आणि वेळेत उपस्थित असणे आवश्यक असणार आहे. चला तर बघुया नेमके कोणते कागदपत्र उमेदवाराने सोबत बाळगणे आवश्यक असणार आहे.
Central Railway Recruitment Documents
१) सर्व आवश्यक माहिती भरलेला अर्ज.
२) सद्याचे दोन पासपोर्ट सायझ फोटो.
३) मान्यता प्राप्त विद्यापीठ कडून शैक्षणिक प्रमाणपत्र.
४) अनुभव प्रमाणपत्र.
५) जन्म तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
६) आधार कार्ड किंवा पॅनकार्ड.
७) जात प्रमाणपत्र.
आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने पदानुसार वेगळे अर्ज करायचा आहे.
Central Railway Recruitment 2024 Application Fee
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उच्च माध्यमिक शाळा मध्ये असणाऱ्या विविध रिक्त पदासाठी मुलाखती घेतली जाणार आहे. उमेदवाराची निवड ही मुलाखत या एकाच निवड पद्धतीनुसार होणार आहे. त्यामुळे उमेदवाराने मुलाखती साठी स्व खर्चाने मुलाखत स्थळी उपस्थित राहायचे आहे. यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क अथवा परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क : | निःशुल्क |
Central Railway Recruitment 2024 Remuneration
Post Graduate Teacher , Trained Graduate Teacher, Primary School Teacher , Craft Drawing And Extra Curricular Activity Teacher यासारख्या विविध प्रकारच्या पदांसाठी रेल्वे बोर्डाने आपल्या जाहिराती मध्ये पदानुसार ठराविक वेतनश्रेणी जाहीर केले आहे.
चला तर बघुया की शिक्षकाच्या कोणत्या पदासाठी किती मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या टेबलवर नजर टाकूया आणि जाणून घेऊया.
पदांचे नाव : | वेतनश्रेणी |
पदव्युत्तर शिक्षक : | ₹२७,५०० रुपये प्रति महिना |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : | ₹ २६,२४० रुपये प्रति महिना |
प्राथमिक शाळा शिक्षक : | ₹ २१,२५० रुपये प्रति महिना |
हस्तकला , चित्रकला आणि अतिरिक्त अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक : | ₹ २१,२५० रुपये प्रति महिना. |
Conclusion
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग मधील असणाऱ्या नैनपुर मध्यप्रदेश येथे असणाऱ्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उच्च माध्यमिक शाळा मध्ये पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक, हस्तकला , चित्रकला आणि अतिरिक्त अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक इत्यादी शिक्षक पदाच्या एकूण २१ पदासाठी थेट मुलाखती मधून निवड प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांना दिनांक १७ मे २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता अर्ज आणि सोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन बोर्डाने जाहीर केलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. उमेदवाराची निवड ही संपूर्णतः मुलाखत या एकाच टप्प्यात होणार आहे.
Frequently Asked Questions
१) Central Railway Recruitment 2024 साठी कोण अर्ज करू शकते ?
उत्तर : Central Railway Recruitment आयोजित भरती प्रक्रियेत विविध पदासाठी जी पात्रता लागते ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे यासाठी उमेदवाराने वरील जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
२) Central Railway Recruitment 2024 द्वारे कोणती शिक्षक पदे भरली जाणार आहेत ?
उत्तर : Central Railway Recruitment द्वारे पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक, हस्तकला , चित्रकला आणि अतिरिक्त अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक यासारखे पदे ही विविध विषयानुसार भरली जाणार आहेत.
३) Central Railway Recruitment साठी शिक्षक पदाची निवड प्रक्रिया कशी असणार आहे ?
उत्तर : विषयानुसार होणाऱ्या विविध पदाच्या शिक्षकांची निवड ही वैयक्तीक मुलाखत या एकाच टप्प्यात होणार आहे.
४) Central Railway Recruitment द्वारे किती पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ?
उत्तर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बोर्डाकडून आयोजित भरती प्रक्रियेत विविध शिक्षक पदांच्या एकूण २१ जागा भरल्या जाणार आहेत.
५) Central Railway Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ?
उत्तर : इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये अर्ज भेटेल तो अर्ज आणि आवश्यक कागदपत्र सोबत जोडायची आहे.