NPCL Recruitment न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत ४०० जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार.

NPCL Recruitment न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने नुकतीच एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एकूण ४०० जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या मागविण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे.

NPCL Recruitment Overview

NPCL न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत जाहीर केलेल्या जाहिरात क्रमांक २०२४/०२ नुसार कार्यकारी प्रशिक्षणार्थी २०२४ साठी GATE २०२२ २०२३ आणि २०२४ दिलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांची निवड ही जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे होईल आणि निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना या काळात मूळ वेतन देखील दिले जाणार आहे. चला तर बघुया NPCL Recruitment 2024 थोडक्यात ,

जाहिरात प्रसिद्ध :न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड.
( Nuclear Power Corporation Of India Limited)
पदाचे नाव :कार्यकारी प्रशिक्षणार्थी
पदाची संख्या:एकूण ४०० पदे
अर्ज पद्धत :ऑनलाईन पद्धतीने ( Online Mode )
अधिकृत संकेतस्थळ :http://www.npcilcareers.co.in
Indian Army मध्ये ‘इंजिनीअर्स’साठी मोठी भरती,”लेफ्टनंट” पदावर होणार निवड
npcl recruitment

NPCL Recruitment Important Dates

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या जाहिराती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचा कालावधी दिलेला आहे. केवळ याच काळवधी मध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. अपूर्ण अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.

बघुया काय आहेत महत्वाच्या तारखा ,

अर्ज स्विकारण्याची सुरवातीची तारीख –१० एप्रिल २०२४
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख –३० एप्रिल २०२४
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख –३० एप्रिल २०२४
मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग भरती , एकूण ८६१ पदे

.

NPCL Recruitment Vacancies

NPCL मार्फत राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया साठी आपले इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असेलल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.यासाठी मुख्य ब्रांचसोबत त्यासोबत इतर उप शाखा देखील जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आहेत.

एकुण ६ ब्रांच नुसार रिक्त जागांचा आरखडा आपण थोडक्यात बघणार आहोत.

ब्रांच नावपदसंख्या
मेकॅनिकल इंजिनीअरिंग ( Mechanical Engineering ) :१५०
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ( Electrical Engineering ) :६९
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ( Electronics Engineering ) :२९
इन्स्ट्रूमेंटेमेशन इंजिनिअरिंग ( Instrumentation Engineering ) :१९
सिव्हिल इंजिनिअरिंग ( Civil Engineering ) :६०
केमिकल इंजिनीअरिंग ( Chemical Engineering ) :७३
एकुण पदे :४००

आयोगाने सोबतच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अपंग घटक यानुसार देखील रिक्त जागांचा तपशील दिला आहे.

खुला प्रवर्ग ( Open )१५९
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ( Economically Weaker Sections)३९
अनुसुचित जाती ( Scheduled Caste )६१
अनुसूचित जमाती ( Scheduled Tribe )३२
इतर मागासवर्गीय ( Other Backward classes)१०९
एकुण पदे४००

NPCL Recruitment Eligibility Criteria

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने सर्व आवश्यक पात्रतेच्या अटी आणि निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत. यामध्ये प्रामुख्याने वयाची अट, शैक्षणीक अटी , निवड प्रक्रियेसाठी असेलल्या अटी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

१) वयोगट / वयोमर्यादा ( Age Limit / Age Relaxation) :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय विचारात घेता , कमीत कमी १८ वय वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा ही खुला प्रवर्ग आणि अर्थिक दुर्बल घटकांसाठी २६ वर्ष आहे. इतर प्रवर्ग म्हणजेच अनुसुचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अपंग घटक यांच्यासाठी वयाच्या बाबतीत वय शिथिलता देखील देण्यात आली आहे.

बघुया नेमकी किती कमाल वय आणि वय शिथिलता देण्यात आली आहे

प्रवर्गवय
खुला प्रवर्ग ( Unreserved ) , आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ( EWS ) : ३ वर्ष२९ वर्ष
अनुसूचित जाती ( Scheduled Caste ), अनुसूचित जमाती (Scheduled Tibes ) : ५ वर्ष३१ वर्ष
अपंग घटक ( Person With Disability ) यांच्यासाठी : १० वर्ष३६ वर्ष
पूर्व सैनिक ( Ex Servicemen ) कमिशन ऑफिसर : ५ वर्ष३१ वर्ष

कमाल वय शिथिलता बाबत आयोगाने कमाल वय हे ५६ वर्ष दिले आहे. केवळ याच वयोमर्यादा पर्यंत वय शिथिलता दिली जाणार आहे.

२) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) :

आपले इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार हे या पदासाठी पात्र ठरतील. उमेदवारांचे पदवी शिक्षण हे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट मधून आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक असून यामध्ये इंजिनीअरिंग पदवी मध्ये कमीत कमी ६० तक्के प्राप्त असावे. यात BE B. Tech B.SC Engineering पदवीचा समावेश आहे.

सोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवारांने GATE परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील चालू वर्षा सहित मागील दोन वर्षात म्हणजेच २०२२,२०२३, २०२४ मध्ये GATE परीक्षा दिलेले उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र असतील.

npcl recruitment

NPCL Recruitment Selection Process

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड साठी होणारी निवड प्रक्रिया ही संपूर्णपणे उमेदवारांना गेट मध्ये मिळालेल्या गुण टक्केवारी वर आधारित असेल. यासाठी गेट २०२२,२०२३,२०२४ दिलेले उमेदवार पात्र असतील. आणि केवळ दिलेल्या वर्षाची गेट परीक्षा चे गुण ग्राह्य धरले जातील.

प्रशिक्षण कालावधी ( Training Period ) :

निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही एका अभ्यासक्रमांसाठी एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असेल.या अभ्यासक्रमामध्ये साधारण जल रिॲक्टर स्ट्रिम आणि प्रेशर आधारित जल रिऍक्टर स्ट्रीम यांचा सामवेश आहे.उमेदवाराने अर्ज भरताना यापैकी एकाची निवड करायची असून सिव्हिल इंजिनिअरिंग साठी कोणताही पर्याय नसेल.

प्रशिक्षण वेतन ( Training Stipend ) :

निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी मध्ये मूळ वेतन म्हणून रुपये ५५,००० प्रती मास सोबतच पुस्तक भत्ता म्हणून रुपये १८, ००० प्रती मास मिळणार आहेत. एन पी सी एल द्वारा उमेदवारांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

NPCL Recruitment How to Apply

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपण सर्व आवश्यक पात्रता निकष पूर्ण करीत आहोत का बघणे आवश्यक आहे तसे नसल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे गेट चे मागील तीन वर्षापैकी एका गेट परीक्षा चे प्रवेश पत्र किंवा गुण पत्रक सोबत ठेवावे.

ऑनलाईन अर्ज करण्याचे चार टप्पे आहेत. यात नावनोंदणी , लिंक अक्टिवेशन, अर्ज भरणे आणि अर्ज शुल्क भरणे असे तीन टप्प्याचा समावेश होतो.

टप्पा १ : पहिल्या टप्प्यात उमेदवाराने www.npcilcareers.co.in वर जावून नाव नोंदणी करायची आहे. तसेच यासाठी गेट प्रवेश पत्रावर दिलेल्या नोंदणी क्रमांक वापरून नोंदणी करायची आहे. नोंदणी करताना नोंदणी क्रमांक, पूर्ण नाव , जन्म तारीख, जात , ईमेल आयडी , मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरून नोंदणी करायची आहे.

टप्पा २ : नोंदणी झाल्यावर एक ॲक्टिवेशन लिंक तयार होईल व ती लिंक उमेदवाराच्या ईमेल आयडी वर पाठवली जाईल. उमेदवारांनी ईमेल आयडी वर आलेल्या या लिंकवर क्लिक करून ॲक्टीवेट करायची आहे.

टप्पा ३ : यानंतर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. यात वैयक्तिक माहिती , शैक्षणिक माहिती , संपर्क माहिती, कामाचा अनुभव , फोटो आणि हस्ताक्षर इत्यादी माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

टप्पा ४ : ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी आवश्यकतेनुसार अर्ज शुल्क देखील भरायची आहे. यासाठी आयोगाने ऑनलाईन पद्धतीचां पर्याय दिलेला आहे.खुला प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर मागासवर्गीय घटक : ५०० रुपये भरायचे आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग घटक : कोणतेही शुल्क भरायचे नाही.

Helpdesk :

अर्ज भरताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मदत म्हणून कॉन्टॅक्ट अस वर जावून संपर्क करायचा आहे. संपर्क करण्याचा कालावधी हा १० एप्रिल ते ३० एप्रिल असा असेल. केवळ याच कालावधी मध्ये आलेले प्रश्न , अडचण सोडवली जाईल.

NPCL Recruitment Application Fee

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली अर्ज शुल्क भरायची आहे. यासाठी पेमेंट विंडो ही अर्ज सुरू झाल्यापासून म्हणजेच १० एप्रिल पासून ओपन असून अर्ज स्विकारण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत म्हणजेच ३० एप्रिल पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारने अर्ज शुल्क भरता येणार नाही.

बघुया नेमके किती अर्ज शुल्क भरायचे आहे.

प्रवर्गअर्ज शुल्क
खुला प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर मागासवर्गीय घटक :५०० रुपये
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग घटक :कोणतेही शुल्क नाही

NPCL Recruitment Documents

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवारांना विचारलेली सर्व माहिती जसे की वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती , शैक्षणिक माहिती, जात वैधता माहिती यासारखे माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. उमेदवाराने अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारेच पुढील कागदपत्रे तपासणी पडताळणी केली जाणार आहे.

बघुयात कोण कोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहे.

१) जन्म तारीख साठी : दहावी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.

२) पदवी प्रमाणपत्र.

३) गुणपत्रक.

४) अनुसूचीत जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र.

५) अपंग प्रमाणपत्र.

६) पूर्व सैनिक प्रमाणपत्र.

७) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र.

८) GATE २०२२ २०२३ २०२४ यापैकी एकाचे प्रवेश पत्र किंवा गुण प्राप्त पत्रक.

९ ) नावात बदल असल्यास तसे प्रमाणपत्र.

१० ) केंद्र सरकार किंवा राज्य सरकार वा इतर संस्था मधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ना हरकत प्रमाणपत्र

Frequently Asked Questions

१) NPCL Recruitment मार्फत किती जागा भरल्या जाणार आहेत ?

उत्तर : NPCL Recruitment मार्फत एकूण ४०० जागा भरल्या जाणार आहेत.

२) NPCL Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर : NPCL Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे.

३) NPCL Recruitment साठी कोण अर्ज करू शकते?

उत्तर : इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण तसेच गेट परीक्षा दिलेला उमेदवार अर्ज करू शकतो.

४) NPCL Recruitment साठी कोणते इंजिनिअर उमेदवार अर्ज करू शकतात ?

उत्तर : मुख्य ब्रांचसोबत त्यासोबत इतर उप शाखा देखील जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आहेत. मुख्य ६ ब्रांच पुढील प्रमाणे . मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ,इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ,इन्स्ट्रूमेंटेमेशन इंजिनिअरिंग , सिव्हिल इंजिनिअरिंग , केमिकल इंजिनीअरिंग.

५) NPCL भरती प्रक्रिया साठी लागणारे अर्ज शुल्क किती आहे ?

उत्तर : खुला प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर मागासवर्गीय घटक : ५०० रुपये आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग घटक : कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.