SSC CHSL Staff Selection Commission अंतर्गत Combined Higher Secondary ( 10+2 ) Level Examination मार्फत नुकतेच एक जहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून केंद्र सरकारच्या विविध आस्थापना मध्ये असणाऱ्या रिक्त जागा या भरती प्रक्रियेमार्फत भरली जाणार आहेत. तब्बल ३७१२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना ही एक मोठी संधी असणार आहे. चला तर बघूया ही एकूण ३७१२ जागांची जाहिरात थोडक्यात.
SSC CHSL 2024 Overview
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकूण ३७१२ जागा या भरल्या जाणार असून पात्र उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज स्विकारण्याची सुरवात ८ एप्रिल पासून सुरू झाली आहे. यामध्ये गट क पदे असून केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच संविधनिक / असंविधानिक संस्थांमध्ये निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerks ), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( Junior Secretariat Assistant), डेटा एंट्री ऑपरेटर ( Data Entry Operators ) ह्या पदांचा समावेश आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे महत्वाच्या तारखा , जागांचा तपशील , निवड प्रक्रिया , शैक्षणिक पात्रता इत्यादीचा तपशील दिला आहे.
जाहिरात प्रसिद्ध : | स्टाफ सिलेक्शन कमिशन ( Staff Selection Commission ) |
पदांची संख्या : | ३७१२ पदे |
पदाचे नाव : | निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerks ), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( Junior Secretariat Assistant), डेटा एंट्री ऑपरेटर ( Data Entry Operators ) |
अर्ज पद्धत : | ऑनलाईन ( Online Mode) |
अधिकृत संकेतस्थळ : | https://ssc.gov.in |
SSC CHSL 2024 Important Dates
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या कालावधी मध्येच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीनें करायचा आहे. अर्ज स्विकारण्याची सुरवात ८ एप्रिल पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ७ मे आहे. बघुया आयोगाने कोणत्या महत्वाच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत.
अर्ज स्विकारण्याची सुरुवातीची तारीख : | ८ एप्रिल २०१४ |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : | ७ मे २०२४ |
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : | ८ मे २०२४ |
अर्जात बदल करण्यासाठी कालावधी : | १०-११ मे २०२४ |
Tier 1 परीक्षा कालावधी : | जून-जुलै २०२४ |
Tier 2 परीक्षा कालावधी : | लवकरच जाहीर |
SSC CHSL 2024 Vacancies
स्टाफ सिलेक्शन कमिशनने आपल्या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या ३७१२ ही तात्पुरत्या स्वरूपाची असून यात वाढ किंवा घट होण्याची शक्यता असून अंतिम जागांचा संपूर्ण तपशील लवकर आयोग आपल्या अधिकृत संकेतस्थळावर https://ssc.gov.in जाहीर करणार आहे. यामध्ये पदां नुसार आणि विविध प्रवर्गानुसार जागांचा तपशील असेल. आयोगाने राज्य अथवा झोन नुसार जागांचा तपशील जमा केला नुसार तो उपलब्ध झाल्यास आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल येईल.
एकूण पदे : ३७१२
पदाचे नाव : १) निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerks )
२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( Junior Secretariat Assistant)
३) डेटा एंट्री ऑपरेटर ( Data Entry Operators )
Table of Contents
SSC CHSL 2024 Eligibility Criteria
आयोगाने उमेदवारांसाठी पात्रतेचे निकष आपल्या जाहिराती मध्ये दिलेले आहे.त्यानुसार पाहूया काय आहे शैक्षणिक आणि वयोमर्यादा बाबतचे निकष.
१) शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) :
आयोगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात ही Combined Higher Secondary level Examination साठी असल्याने किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी असणार आहे.
१) निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerks ) , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( Junior Secretariat Assistant) पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड कडून बारावी उतीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) डेटा एंट्री ऑपरेटर ( Data Entry Operators ) पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड कडून विज्ञान मध्ये Mathematics विषयासह बारावी उतीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
२) वयोमर्यादा ( Age Limit) :
१ ऑगस्ट २०२४ वयोमर्यादा बाबत ग्राह्य तारीख धरल्यास ऑनलाईन अर्ज करनाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असून कमाल वयोमर्यादा ही २७ वर्ष आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९७ च्या अगोदर आणि १ ऑगस्ट २००६ नंतर झालेला नसावा. केवळ ह्याच कालावधी मध्येच वय निकष पूर्ण केलेले उमेदवार पात्र असतील.
सोबतच आयोगाने अनुसुचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अपंग घटक प्रवर्गानुसार वय शिथिलता ( Age Relaxation ) देखील स्पष्ट केली आहे.
प्रवर्ग | वय शिथिलता ( Age Relaxation ) |
अनुसूचीत जाती / अनुसूचित जमाती (Scheduled Caste / Scheduled Tribes) : | ५ वर्ष |
इतर मागासवर्गीय (Other Backward Classes) : | ३ वर्ष |
अपंग घटक अनुसुचित जाती / अनुसूचित जमाती (Person with Disability SC/ST) : | १५ वर्ष |
अपंग घटक इतर मागासवर्गीय (Person With Disability OBC) : | १३ वर्ष |
एक्स सर्विसमन (Ex Servicemen) : | ऑनलाइन अर्ज करायच्या शेवटच्या तारखेनुसार वास्तविक वयापासून लष्करी सेवेची वजावट केल्यानंतर ३ वर्षे. |
SSC JE स्टाफ सिलेक्शन अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” या पदासाठी भरती , तब्बल ९६८ पदे भरली जाणार.
SSC CHSL 2024 Selection Process
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे Tier 1 आणि Tier 2 अशी परीक्षा होणार आहे. पदाच्या आवश्यकतेनुसार स्किल टेस्ट ( Skill Test ) घेतली जाईल.
आयोगाने Tier एक आणि Tier दोन साठी कमीत कमी मार्क्सची मर्यादा ठेवली आहे.
खुला प्रवर्ग: ३०% ,
इतर मागासवर्गीय आणि अर्थिक दुर्बल घटक: २५ %
आणि इतर प्रवर्ग : २०%
Tier १ मध्ये मिळालेल्या मार्क्सचे नोर्मलायझेशन करून उमेदवाराची मेरिट लिस्ट लावली जाईल. यात पात्र असलेले उमेदवारच Tier २ साठी बोलावले जातील. अंतिम यादी जाहीर करताना केवळ Tier 2 मध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरले जाईल आणि यावरच मेरिट लिस्ट ही जाहीर केली जाईल.
Post Preference
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवाराने पदाचा क्रम देणे आवश्यक असणार आहे. पदाचा क्रम देताना उमेदवाराने पद, विभाग नुसार क्रम द्यावा. जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना पदाचा क्रम भरणार नाहीत असे उमेदवार अंतिम निवडी नंतर कोणताही पदासाठी ग्राह्य धरले जाणार नाही आहे.
SSC CHSL 2024 Exam Pattern
Tier 1 आणि Tier 2 दोन्ही संगणक आधारित टेस्ट होतील.
Tier एक मध्ये १०० प्रश्न आणि २०० गुण असून पेपर कालावधी हा एक तास असेल. तर या मध्ये English Language , General Intelligence , Quantitate Aptitude, General Awareness विषय असतील. प्रत्येक विषयाचे २५ प्रश्न असतील.Tier एक साठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे यानुसार ०.५० गुण हे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील.
Tier 2 मध्ये तीन सेक्शन आणि प्रत्येक सेक्शन मध्ये 2 Module असतील.
पहिल्या सेक्शन मध्ये Mathematics Abilities , Reasoning and General Intelligence असतील.
दुसऱ्या सेक्शन मध्ये English Language and Comprehension, General Awareness विषय असतील.
तिसऱ्या सेक्शन मध्ये Computer Knowledge Test , Skill Test/ Typing Test घेतली जाणार आहे. हा सेक्शन फक्त पात्रता तपासण्यासाठी घेतला जाईल.
यानुसार उमेदवार हा प्रत्येक सेक्शन मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Tier २ साठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे यानुसार १ गुण हे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील.
दोन्ही Tier साठी परीक्षा भाषा ही English, हिंदी किंवा जी भाषा उमेदवाराने अर्ज भरताना निवडली असेल त्याच भाषेत ऑनलाईन पद्धतीने होईल. परीक्षा पार पाडल्यानंतर आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतलिका आणि मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. उमेदवाराने वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर भेट देणं आवश्यक आहे.
SSC CHSL 2024 Syllabus
आयोगाने आपल्या जाहिराती मध्ये दोन्ही Tier साठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम सविस्तरपणे दिलेला आहे. उमेदवारांना विनंती आहे की हा अभ्यासक्रम काळजीपूर्वक अभ्यासून परीक्षेची तयारी करावी.
SSC CHSL 2024 How to Apply
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर आपले वन टाईम नोंदणी One Time Registration करणे आवश्यक आहे. उमेदवाराने जुन्या संकेतस्थळावर नोंदणी केली असल्यास म्हणजेच www.ssc.nic.in यावर असल्यास ती नवीन संकेतस्थळावर www.ssc.gov.in वापरता येणार नाही आहे. उमेदवारांनी www.ssc.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ www.ssc.gov.in यावर जावून लॉगिन करायचे आहे.
SSC CHSL 2024 Documents
अर्ज भरतेवेळी उमेदवाराने भरलेल्या माहितीची तपासणी पडताळणी करिता उमेदवाराने अपलोड केलेले कागदपत्रे आयोगाने जाहीर केलेल्या वेळेत उपस्थित असणे आवश्यक असणार आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नमूद केले आहे की आयोग कोणतेही प्रकारचे वेटींग लिस्ट अथवा पॅनल ठेवणार नाही आहे.
सादर करायचे कागदपत्रे खालील प्रमाणे ,
१) दहावी बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
२) जातीचे प्रमाणपत्र
३) अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
४) वय शिथिलता घेतल्यास प्रमाणपत्र
५) इतर आवश्यक प्रमाणपत्र
SSC CHSL 2024 Application Fee
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क देखील भरायचे. अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ही ८ मे असून या तारखे पर्यंतच अर्ज शुल्क भरायचा आहे. अर्ज पूर्ण होण्यासाठी उमेदवाराने अर्जासह अर्ज शुल्क / परीक्षा शुल्क भरणे आवश्यक असून अर्ज शुल्क न भरल्यास पुढील टप्प्यासाठी अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही आहे.
महिला वर्ग , तसेच अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि अपंग घटक हे आरक्षणासाठी पात्र असतील. त्यांना कोणत्याही प्रकारची शुल्क भरायची नाही आहे.
अर्ज शुल्क : ₹ १००
सदर रक्कम ही फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. यासाठी भीम ॲप , नीट बँकिंग , तसेच डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात.
उमेदवारांना अर्जात कोणत्याही प्रकारची सुधारणा करायची असल्यास आयोगाने १० मे आणि ११ मे २०२४ अशा दोन दिवसाचा कालावधी दिला आहे. उमेदवाराने आवश्यक ते शुल्क भरून अर्जात कोणत्याही प्रकारचे सुधारणा करू शकतो.
SSC CHSL 2024 Conclusion
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ३७१२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कालावधी ८ एप्रिल – ७ मे असून यात निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerks ), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( Junior Secretariat Assistant), डेटा एंट्री ऑपरेटर ( Data Entry Operators ) पदे भरली जाणार आहे. अर्ज शुल्क ₹१०० असणार आहे आणि भरतीच्या टप्प्यातील पहिला टप्पा हा जून – जुलै २०२४ मध्ये पार पडणार आहे.
Central Railway Zone मध्ये पुन्हा एकदा मोठी भरती ,एकूण १११३ रिक्त जागांसाठी पदभरती जाहीर
Frequently Asked Questions
१) SSC CHSL 2024 साठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ७ मे २०२४ आहे.
२) SSC CHSL 2024 मध्ये एकूण किती पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ?
उत्तर : आयोगामार्फत एकूण ३७१२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
३) SSC CHSL 2024 भरती मध्ये कोणती पदे भरली जाणार आहे ?
उत्तर : सदर भरती प्रक्रियामधून निम्न विभागीय लिपिक ( Lower Divisional Clerks ) , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( Junior Secretariat Assistant) , डेटा एंट्री ऑपरेटर ( Data Entry Operators ) ही पदे भरली जाणार आहेत.
४) SSC CHSL चा अर्थ काय आहे ?
उत्तर : SSC CHSL म्हणजेच Staff Selection Commission Combined Higher Secondary level Examination.
५) SSC CHSL 2024 भरती साठी कोण अर्ज करू शकते ?
उत्तर : मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड कडून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे